Wednesday, May 26, 2010

भूगोल:

भूगोल:


              महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागातील, राज्याच्या साधारण मध्यभागी असलेला हा जिल्हा; जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यांनी वेढलेला आहे.              बीडच्या उत्तरेकडे गंगथडी म्हणून ओळखला जाणारा गोदावरी खोर्‍याचा सखल भाग आहे. व दक्षिणेकडे मांजरा खोर्‍याचा भाग आहे. हा जिल्हा म्हणजे गोदावरी -मांजराचे खोरे होय.              जिल्ह्याचा पाण्याचा मुख्य स्त्रोत हा गोदावरी नदीचा. याच नदीने जिल्ह्याची उत्तर सीमा निश्चित केली आहे. गोदावरी बरोबरच सिदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती, वाण या गोदावरीच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात. जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून मांजरा ही दुसरी महत्त्वाची नदी वाहते. चौसाळा, केज, रेना व लिंबा या मांजरा नदीच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात.

जिल्ह्यात दोन मोठे जलसिंचन प्रकल्प आहेत.

१. सिंदफणा नदीवरील माजलगाव प्रकल्प
२. मांजरा नदीवर केज तालुक्यात मांजरा प्रकल्प.
तसेच अंबेजोगाई तालुक्यात वाण नदीवर व पाटोदा तालुक्यात सिंदफणा नदीवर प्रकल्प निर्माण करण्यात आले आहेत.


लोकसंख्या: (संदर्भ: जनगणना २००१)

क्र. तपशील संख्या
क्षेत्रफळ १०,६९३ चौ. कि. मी.
लोकसंख्या २१,६१,२५०
२.१ पुरुष ११,१६,३५६
२.२ स्त्रिया १०,४४,८९४
२.३ ग्रामीण १७,७४,१८०
२.४ शहरी ३,८७,०७०
स्त्री- पुरुष गुणोत्तर १०००: ९३६
साक्षरता एकूण ६७.९९%
४.१ पुरुष ८०.७०%
४.२ स्त्री ५४.५२%

No comments:

Post a Comment