शेती:
खरीपातील कापूस, बाजरी, मूग, तूर, व भूईमुग ही महत्त्वाची पिके होत व महत्त्वाची रब्बी पिके गहू, हरभरा व करडई होत.
ऊस हे जिल्ह्यातील महत्त्वाचे बागायती पिक असून अलीकडील काळात साखर कारखान्यांमुळे उसाखालील क्षेत्र वाढत आहे. ऊस तोडणीच्या हंगामात बरेच शेतकरी बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यात व अनेकदा इतर जवळपासच्या जिल्ह्यांत किंवा क्वचित कर्नाटकमध्येही ऊस तोडणी कामगार म्हणून स्थलांतर करतात.
याशिवाय सूर्यफूल, द्राक्ष, आंबा व कलिंगडाचे पीक जिल्ह्यात घेतले जाते. जिल्ह्यातील नेकनूर परिसरातील ‘कालापहाड’ व अंबेजोगाईमधील ‘पेवंदी’ या जातीचे आंबे महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत.
No comments:
Post a Comment