Wednesday, May 26, 2010

पर्यटन:

पर्यटन:


१२ ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग परळी येथे आहे. ते जवळजवळ सातशे वर्ष जुने असून अहिल्याबाई होळकरांनी त्याचा इ.स. १७०६ मध्ये जिर्णोध्दार केला.
अंबेजोगाई हे श्री योगेश्र्वरी मातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे व येथे खोलेश्वराचे प्राचीन मंदिरदेखील आहे.

बीड जिल्ह्यात अनेक प्रसिध्द मंदिरे व प्रेक्षणीय स्थळे आहेत. कंकाळेश्वर, जटाशंकर मंदिर, खंडेश्र्वीर मंदिर आणि खरडोबा मंदिर ही काही प्रमुख होत. जिल्ह्यातील इतर महत्त्वाची स्थळे म्हणजे बीड, अंबेजोगाई व परळी वैजनाथ ही होत.


                               
बीड हे जिल्ह्याचे प्रमुख व सर्वात मोठेशहर. येथील कंकाळेश्वराचे जलमंदिर प्रसिध्द आहे.



शहराजवळील टेकडीवर श्री खंडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. शहरापासून जवळच खजाना ही प्रसिध्द विहीर आहे. या विहीरीस बाराही महिने पाणी असते. शहरात पीर बालाशहा व मंसूरशहा यांचे दर्गे आहेत.



संतकवी दासोपंत यांची समाधी अंबेजोगाई येथे आहे. दासोपंतांनी लिहिलेली (१२ मीटर लांब व १ मीटर रुंदीची) पासोडी, येथे पाहावयास मिळते.


ज्यांना मराठीतील आद्यकवी मानले जाते अशा कवी मुकुंदराज यांची अंबेजोगाईमध्ये समाधी आहे. याचबरोबर या तालुक्यातील धर्मपुरी येथील केदारेश्र्वराचे मंदिर देखील प्रसिद्ध व प्रेक्षणीय आहे.


      कवी मुकूंदराज यांची समाधी बीड तालुक्यातील मांजरसुभा येथे लिंगायत पंथातील श्री मन्मथ स्वामींचे मंदिर आहे, तसेच येथून जवळच कपिलधार नावाचा धबधबा आहे.

       
      माजलगाव तालुक्यात गंगामसला येथील श्री मोरेश्वराचे किंवा भालचंद्र गणेशाचे स्वयंभू व जागृत स्थान प्रचलित आहे. माधवराव पेशवे यांनी हे मंदिर बांधल्याचे उल्लेख सापडतात.

           
बीड तालुक्यातील नायगांव येथील मोरांसाठीचे अभयारण्य हे राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण अभयारण्य होय.

धारूर येथे सातवाहनकालीन भुईकोट किल्ला आहे. शिवकाळात नेताजी पालकर यांस या किल्ल्यातील कारावासात ठेवण्यात आले होते. येथील अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले अंबादेवीचे मंदिर, हेमाद्रीपंतांनी बांधलेले धारेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.

     
पाटोदा तालुक्यात विंचरणा नदीवरील सौताडा येथील धबधबा प्रसिद्ध आहे. राक्षसभुवन हे गेवराई तालुक्यातील गोदावरी काठचे गाव होय. येथील शनी मंदिर प्रसिद्ध आहे.

उपरोक्त स्थानांसह पाटोदा तालुक्यातील चिंचोली हे थंड हवेचे ठिकाण, येथीलच श्री गहिनीनाथांचे मंदिर व बीड तालुक्यातील नवगण - राजुरी येथील नऊ गणेशमूर्तींचे स्थान ... ही इतर प्रेक्षणीय स्थळेसुद्धा प्रसिद्ध आहेत.

2 comments:

  1. Namaskar Manoj,

    I am from Beed but currentnly in USA since last few years. I met with some historians who know Beed history and done significant research which is not well known yet. If you like, you can join hands to the noble cause of publishing our history to the world.

    I have written two articles on my blog about Beed. Please visit it if you have some time.
    http://bhaskarkende.blogspot.com/

    s-sneh,
    Bhaskar Kende

    ReplyDelete
  2. why beed nagar parishad is not involving NARAYEN GADH AS A TOURISUM SPOT

    ReplyDelete